आलू पराठा (Aaloo Paratha)

आलू पराठा :

        आलू पराठा हा भारता मध्ये लोकप्रिय असं खाद्य आहे, बनवण्यास हि सोपं आणि खाण्यास हि अप्रतिम ,आलू पराठा हा दही सोबत किंवा टोमॅटो चा ketchup  सोबत एक नंबर लागतो .नाश्त्या ला सकाळी खाण्यास होणारा झटपट असा हा नाश्ता , तर आपण पाहणार आहोत आज आलू पराठ्याची रेसिपी ,



साहित्य :

  • ३कप गहूच पीठ 
  • २ कप पाणी 
  • ३ tbsp ऑइल (घी  चा हि वापर करू शकता )
  • १/२ चमचा ओवा 
  • १/२ चमचा हळद 
  • १चमचा तिखट 
  • १चमचा धना  पावङर 
  • १/२ चमचा जिरे 
  • १/४ चमचा हिंग 
  • चवीनुसार मीठ 
  • लसूण पेस्ट १ चमचा 
  • २चमचा शेजवान चटणी (२ tbsp लेमन juice  चा हि वापर करू शकता optioanl  )
  • कोथिंबीर 
  • ४ उकडलेले बटाटे कुचकरून 
  • २ हिरव्या मिरच्या कापून 
  • २ कांदे medium  size चे कापून 



कृती :
   
               प्रथम एका मोठ्या बाउल मध्ये गहूच पीठ घेऊन त्यामध्ये थोडं मीठ, ओवा , जिरे ,हळद घालून पीठ मळून घ्या .नेहमी आपण मळतो तसे चपाती  ला नका मळू .थोडस त्याहून घट मळा ,आणि आर्धा तास हे पीठ केलेलं भिजू द्या . 

               आता आपण तयारी करणार आहोत ती म्हणजे  बटाट्याचे सारण - एक कढई घेऊन गॅस वरती ठेव .थोडी गरम होताच. त्यामध्ये १  tbsp ऑइल टाकून कांदा टाका हलकस भाजून घ्या ,आता त्यामध्ये हिरवी मीरची आणि लसूण ची पेस्ट  घाला ,परतून आता त्या मध्ये तिखट आणि धना पावडर घाला ,तसेच चविनुसार मीठ आणि २ चमचा शेजवान चटणी घाला . आणि हे हलवून घेताच त्यामध्ये कुचकरून ठेवलेले बटाटे ऍड करा ,कोथिंबीर चिरून ठेवलेली  हि टाका हे सगळं मिश्रण एकजीव होईपर्यँत हलवून घ्या २ मिनिटे साठी.  आणि हि भाजी /सारण  थोडस ५ मिनिटे साठी  थंड होऊ द्या . 

             आता आपण पराठे करायला घेणार आहोत .आपण मळून ठेवलेले पीठ'छानस भिजलेलं असेल . छोटे गोळे तयार करून आता त्याचा वाटी सारखा आकार तयार करून घ्या . म्हणजे आपण पोळी ला सारण भरतो तसे, केलेलं बटाट्याचं सारण केलेल्या कणकी च्या अकारा मध्ये भरा .आणि गोळा पॅक करा . आता थोडस सुख्या पीठ मध्ये दोन्ही बाजूस लावून घ्या . आणि हाताने थोडे दाबा . आणि बेलन च्या साह्याने आतले सारण कडेपर्यंत पोहचेल असं लाटून घ्या . मेडीयम flame वरती तव्या मध्ये केलेलं पराठा  हाताच्या साह्याने टाका आधी दोन्ही बाजूने शेकून घ्या मग नंतर तुप दोन्ही बाजूने  लावा आता मस्त असा पराठा आपला फुलेल . चमचा च्या साह्याने ज्या ठिकणी भाजयचं राहील असेल ते भागा ला प्रेस करून भाजून घ्या .. छानसा असा आपला आलूचा पराठा फुललेला तयार आहे .  डिश मध्ये घेऊन सोबत दही किंवा , टोमॅटो ketchup  सोबत सर्व्ह करा .... 

***********************************************************************************************************************************************


English  translation :

  
Aaloo Paratha:

                                Aloo Paratha is a popular food in India, it is easy to make and amazing to eat, Aloo Paratha is number one with curd or tomato ketchup. Breakfast is a very important meal .  So today we will see the recipe of Aaloo Paratha. 



Ingredients :

  • 3 cups wheat flour
  • 2 cups water
  • 3 tbsp oil (you can also use ghee)
  • 1/2 tsp ova
  • 1/2 teaspoon turmeric
  • 1 tablespoon chili powder
  • 1 tablespoon coriander powder
  • 1/2 tsp cumin seeds
  • 1/4 teaspoon asafoetida
  • Salt to taste
  • Garlic paste 1 tbsp
  • 2 tbsp Sejwan Chutney (you can also use 2 tbsp lemon juice optioanl)
  • Cilantro
  • 4 Boiled mashed potatoes
  • Cut 2 green chillies
  • Cut 2 onions of medium size



Action:
   
               First, take wheat flour in a large bowl, add a little salt, ova, cumin seeds, turmeric powder and knead the dough. Do not knead the chapati as you always get.

               Now we are going to prepare the potato paste - take a pan and put it on the gas. Add 1 tbsp oil, add onion, lightly fry, now add green chilli and garlic paste, then add red chilli and coriander powder, salt to taste and 2 tbsp shejwan chutney. Once it is stirred, add mashed potatoes, chopped cilantro and stir for 2 minutes till the mixture becomes homogeneous. Let it cool for 5 minutes.

             Now we are going to make parathas. The flour you have kneaded will be soaked. Make small balls and now shape them into a bowl. I mean, just like you fill the poli with saran, fill the mashed potatoes in the size of the dough .and pack the dough. Now roll in a little dry flour on both sides. And press lightly by hand. And with the help of a roller, roll it so that the inner essence reaches the side. Put the paratha made in the tawa on the medium flame by hand, first bake it on both sides, then apply the ghee on both the sides. With the help of a spoon, press the part where you want to roast it and roast it. Your potato paratha is ready. Serve with yogurt or tomato ketchup.

              

Post a Comment

0 Comments